परवेज शेख शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ पार पडले.यावेळी त्यांनी ‘पथदर्शी विकासाची ठाणे’ या कॉफी टेबलचे प्रकाशन, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हबचे ई–उदघाटन, संकेतस्थळाचे अनावरण, कंमाड ॲण्ड कंट्रोल सेंटर ठाणे ई–उदघाटन, हाजुरी येथील क्लस्टर योजनेचे ई-भूमीपूजन केले तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत कळवा-पारसिक, कोलशेत, वाघबीळ, बाळकूम-साकेत, कोपरी, शास्त्रीनगर, नागलाबंदर खाडी किनारा विकास प्रकल्पांचे ई- भूमीपूजन केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ ई-शुभारंभ, घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे ई–भूमीपूजन, बांधकाम व तोडफोड कचरा पुर्नप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, शहरी जंगले प्रकल्पाचे ई-भूमीपूजन, विज्ञान केंद्र प्रकल्पाचे ई-भूमीपूजन, ‘लाडकी लेक’ दत्तक योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले.महाराष्ट्रातील शासकीय घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलीसांसाठी राखीव ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.त्यानंतर त्यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रतिनिधीक स्वरुपात बीएसयुपी योजनेंतर्गत सदनिका वाटप व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले. अनाथ, निराधार, निरश्रीत बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात अनुदान वाटप करण्यात आले.
त्यानंतर त्यांनी डोंबिवली एमआयडीसीमधील रासायनिक प्रदूषणामुळे झालेले गुलाबी रस्ते आणि प्रदूषित नाल्याची पाहणी केली.
–
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत झालेल्या बैठकीमध्ये डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची तपासणी करून वर्गवारी करण्यात येणार तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व कंपन्या करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.औद्योगिक वसाहतींना लागून ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्याठिकाणी सर्वेक्षण करून सदर घातक रासायनिक कारखाने अन्यत्र हलविण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, महापालिका प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून नियोजन केल्यास या उपक्रमांना आणखीही आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे यावेळी सांगितले.
यावेळी नगरविकास आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जी, युवासेनाप्रमुख, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महापौर नरेश म्हस्के जी, खासदार राजन विचारे जी, खासदार श्रीकांत शिंदे जी, आमदार प्रताप सरनाईक जी, आमदार रविंद्र फाटक जी उपस्थित होते.