मोफत नेत्र चिकित्सा,मोफत चष्मा वाटप
सलग ५ वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने सोमवारी ऑटोरिक्षा व टॅक्सी वाहतूकदारांसाठी संघटनेचे मोफत सदस्यत्व, रुपये १ लाख रकमेचा विमा तसेच मोफत नेत्र चिकित्सा,मोफत चष्मा देण्यात आला.संघटनेचे कुर्ला येथील “उद्धवगड” मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.मुंबईसह राज्यातील जास्तीत जास्त ऑटोरिक्षा-टॅक्सी वाहनचालक, मालकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा वाहतूक नेते हाजी अरफात शेख यांची होती.स्वतः पहिला फॉर्म भरत आणि डोळे तपासून घेतले.यावेळी हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांनी या शिबराचा फायदा घेत फॉर्म भरले.नवभारतीय शिववाहतूक संघटना ही भाजपा प्रणित वाहतूकदारांची संघटना असून वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणारी संघटना आहे.मंगळवारी बांद्रा येथे सकाळी ११ वाजता राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना भेटून वाहतुकदारांच्या विविध समस्यांवर चर्चा देखील करणार आहेत.