राजधानीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    नवी दिल्ली, दि. ०२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त  निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

    कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमास  महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी प्रमोद कोलपते यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा परिचय  करून दिला.

    ०००

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    - Advertisement -