Home बातम्या आंतरराष्ट्रीय राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या 690 वर, एका दिवसात 55 रुग्ण बाधित

राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या 690 वर, एका दिवसात 55 रुग्ण बाधित

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 690 वर पोहचली असून आज 55 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या 55 रुग्णांमध्ये मुंबईत 29 रुग्ण, पुण्यात 17 रुग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये 04 रुग्ण, अहमदनगर 03 रुग्ण तर औरंगाबादेत 02 रुग्ण बाधित आढळले आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 56 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातही कोरोना व्हायरसने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत औरंगाबादमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.