राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाची घोषणा, पुण्याच्या पाच खेळाडूंना संघात स्थान.

- Advertisement -

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

पटना येथे होणाऱ्या ६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद महिला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघाची अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिन्नर-नाशिक येथे झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून या महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

दिनांक २८ जून २०१९ ते ६ जुलै २०१९ या काळवधीमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे येथे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार व संघ व्यवस्थापक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनिषा गावंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अंतिम १२ खेळाडूंमध्ये राज्य अजिंक्यपद विजेते पुणे संघाच्या ५ खेळाडूंची निवड झाली आहे. तर उपविजेते मुंबई उपनगरच्या २ खेळाडूंची निवड झाली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी १ खेळाडु अंतिम १२ मध्ये स्थान मिळाले आहे.

अंतिम २ खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे:

क्र.खेळाडूचे नावजिल्हा
१.अर्चना नारायण करडेठाणे
 .श्रद्धा विनायक पवाररत्नागिरी
 .दीपिका हेनरी जोशपपुणे
४.अंकिता अजित जगतापपुणे
५.स्नेहल प्रदीप शिंदेपुणे
६.सायली संजय केरीपाळेपुणे
७.आम्रपली जगदीश गलांडेपुणे
८.कोमल सुभाष देवकरमुंबई उपनगर
९.सोनाली रामचंद्र हेळवीसातारा
१०.पूजा जयप्रकाश यादवमुंबई शहर
११.ज्योती पोपट पवारनाशिक
१२.सायली सुभाष नागवेकरमुंबई उपनगर
- Advertisement -