हायलाइट्स:
- राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे दिमाखात झाले लग्न
- लग्नातील दोघांचेही फोटो सोशल मीडियावर झालेत व्हायरल
- लग्नानंतर मराठमोळ्या वेशामध्ये दिसले नवदाम्पत्य
राहुल आणि दिशाच्या लग्नासोबतच त्यांच्या रिसेप्शनचेही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. लग्नानंतर दिशाने वैद्य कुटुंबात केलेल्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ देखील राहुलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर या दोघांचे चाहते भरभरून कमेन्ट करत असून या दोघांना शुभेच्छा देत आहेत.
सर्वसाधारणपणे लग्नानंतर महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते. तशीच पूजा राहुल वैद्यच्या घरीही झाली. ही पूजा नवदाम्पत्याच्या हस्ते झाली. या पूजेच्या वेळी दिशा आणि राहुलने अस्सल मराठमोळा पेहराव केला होता.
दिशाने गुलाबी आणि केशरी अशा रंगसंगतीची साडी नेसली होती. तसेच केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरा माळला होता, गळ्यात मंगळसूत्र आणि काही सोन्याचे दागिने, हातामध्ये चुडा आणि नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ घातली होती. तर राहुलने धोती-कुर्ता घातला होता. हे दोघेजण खूप सुंदर दिसत होते. दिशा तर मराठमोळ्या वेशभूषेमध्ये खूपच सुरेख दिसत होती.
राहुल आणि दिशा अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. परंतु जेव्हा राहुल बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा त्याला भेटायला आलेल्या दिशाला त्याने लग्नाची मागणी घातली होती. त्यामुळे या दोघांची खूप चर्चा झाली होती.