Home ताज्या बातम्या रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध करून देणार -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध करून देणार -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

0

दि. 21 एप्रिल 2020

एकनाथ शिंदे यांनी कोव्हीड -19 उपाययोजने सह तिघा जणांच्या हत्त्ये संबंधी आढावा घेतला. रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध करून देणार
-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि 21: एखाद्या व्यक्तीस कोव्हीड -19 ची लागण झाली किंवा नाही हे रॅपिड टेस्ट किट च्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कळणार असल्याने, रुग्णा वर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे असे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी उपस्थित होते.
कोरोना चा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल यांना आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य प्रशासनाला कोरोना बाधितांच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य राज्य शासन करत आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले नियोजन कौतुकासपात्र असून या नियोजनामुळे कोरोना वर मात करणे शक्य होणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यासाठी प्रयत्न करू त्याच बरोबर कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.
कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिंजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक वाटल्यास याचा विस्तार जिल्हास्तरा पर्यन्त करण्यात येणार आहे. काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे नगरविकास मंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
16 तारखेला कासा पोलीस ठाणे हद्दीत तीन व्यक्तीची अमानुषपणे हत्या करण्यात आली ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाची सीमा सुरु होते.
संबंधित साधू आणि त्यांच्याबरोबरची मंडळी या सीमेवरून जात असताना तेथील पोलिसांनी एवढ्या मध्यरात्री त्यांना अडवून परत पाठवले आणि ते परतत असताना या दुर्गम ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. जिल्हा पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात 100 पेक्षा जास्त लोकांना पकडले, त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
तिघाजणांची हत्या चोर आल्याची अफवा पसरल्या मुळे झाली अश्या अफवा पसरविणाऱ्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.