हायलाइट्स:
- साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा किर्तीचा ठाम निश्चय
- लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही; किर्ती कुल्हारी
- पाच वर्षानंतर किर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल होत आहेत विभक्त
किर्ती म्हणाली की, ‘आपल्या मुलीचा संसार टिकावा, असे प्रत्येक पालकांना वाटते. माझ्या विचारांना वडिलांनी पाठिंबा दिला होता परंतु आईला मात्र मी लग्नबंधनात रहावे असे वाटत होते. ते टिकावे यासाठी मी काही आणखी वेळ द्यावा, असे तिचे म्हणणे होते. परंतु एक वेळ अशी आली की माझी मनःशांती, आनंद हरवत चालला होता. त्यामुळे मला हा कठीण निर्णय घ्यावा लागला.’

किर्ती पुढे म्हणाली की, ‘साहिलच्या आणि माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. इतके वर्षे आम्ही सोबत आहोत, त्यामुळे आमचे लग्न वाचावे यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. परंतु ते वाचू शकले नाही.’ दरम्यान किर्ती आणि साहिलमध्ये नेमके कोणत्या कारणावरून बिनसले याचे कारण अद्याप सांगितलेले नाही. किर्तीने सांगितले की, ‘आमचे लग्न का मोडत आहे, याचे कारण माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे. परंतु यावर जाहिररित्या कोणतेही भाष्य करायचे नाही.’
दरम्यान, ‘माझ्या या निर्णयाला आता पालकांनी पाठिंबा दिला आहे. मी आयुष्यात आतापर्यंत जे जे निर्णय घेतले आहेत, त्याला आईवडिलांनी कायमच पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचा निर्णय देखील होता.’