Home शहरे अहमदनगर लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त,एकास अटक.

लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त,एकास अटक.

0

परवेज शेख लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त,एकास अटक.अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण (घोगरगाव जवळ) शिवारात नगर- सोलापुरला जाणार्‍या कारमध्ये श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचुन गाडीसह सुमारे 7 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.6) सायंकाळी 5 वा. केली.
नगर- सोलापुर रोडवरील मांडवगण शिवारात उभ्या असलेल्या हुंडाई कारमधुन (क्र. एम एच 12 एम ई 85) काही इसमे बनावट नोटा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे इसम भिगवन भागात सोने खरेदी करणार असल्याचेही त्यांना यावेळी समजले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचुन नगर-सोलापुर रोडवरील घोगरगाव मार्गे मांडवगणकडे येणार्‍या कारमधुन 2 लाख 83 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. कारमधील अतुल रघुनाथ आगरकर (वय 26, रा. जवळवाडी, सुपा, ता. पारनेर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या नोटा माने (पुर्ण नाव माहित नाही, रा. मिरजगाव, ता. कर्जत) इसमाने छापल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पोलिस शिपाई अमोल कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल आगरकर व माने यांच्या विरूध्द भादंविक 489 अ, क, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गावीत हे करीत आहेत.
याबाबत अधिक चौकशी केली असता बनावट नोटा बनविण्याचा कारखाना मिरजगाव- बारामती परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली आहे.