लॉकडाऊनचे उल्लंघन कोचिंग क्लास विरुद्ध गुन्हा दाखल

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २३ मे : लॉकडाऊन काळात कोचिंग क्लासेससाठी विद्यार्थ्यांना एकत्र जमा करणाऱ्या कोचिंग क्लासच्या टीचर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तुळजापूर येथील विवेकानंद कोचिंग क्लासेस वर ही कारवाई  शनिवारी दुपारी बारा वाजता करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी चालू आहे. तरीही पापनाशनगर येथील विवेकानंद कोचिंग क्लासेसचे राहुल शहाजी बोबडे यांनी विद्यार्थ्यांना क्लाससाठी एकत्र जमवले होते. यावरून तुळजापूर पोलिस ठाण्याचे गणपत राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोबडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -