पुणे : परवेज शेख
लोणीकंद : महाराष्ट्रभर कोरोनाच्या महामारीतून भयभीत असुन लोकडाऊन च्या काळात सुद्धा गुन्हेगार हे मोकाट असल्याचे दिसून आले आहे याचेच एक उदाहरण म्हणजे लोणीकंद मधील पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून लोणीकंद येथे अंकुश विठ्ठल मल्लाव वय वर्षे ४० याची अंगझडती करत असताना त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीची पिस्तूल अंदाजे किंमत त्याची ४० हजार रुपये व २ जिवंत काढतुसे प्रत्येकी किंमत अंदाजे ५०० रुपये असून ४१००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनमधील गुन्हेगार आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील तपासणीसाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
- Advertisement -