Home क्रीडा वर्ल्ड कप 2019 लाईव्ह: श्रीलंकेची टॉस जिंकून बॅटिंग; टीम इंडियात जडेजा, कुलदीपला संधी

वर्ल्ड कप 2019 लाईव्ह: श्रीलंकेची टॉस जिंकून बॅटिंग; टीम इंडियात जडेजा, कुलदीपला संधी

शेवटच्या साखळी लढतीत भारताविरुद्ध श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला संघात समाविष्ट केलं आहे. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ याआधीच सेमी फायनलसाठी पात्र झाला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचे सेमी फायनलचे मार्ग बंद झाले आहेत.

भारतीय संघाला श्रीलंकेला नमवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंड किंवा न्यूझीलंड यांचा सामना करायचा आहे.

श्रीलंकेने या लढतीसाठी जेफ्री व्हँडरसे याच्याऐवजी थिसारा परेराला संधी दिली आहे.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आहे. बांगलादेशविरुद्धची मॅच जिंकत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. श्रीलंकेविरुद्धची मॅच निव्वळ औपचारिकता आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांना नमवलं. न्यूझीलंविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरीकडे श्रीलंकेचं सेमी फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. श्रीलंकेने 8 मॅचपैकी तीन जिंकल्या आहेत तर तीनमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. दोन मॅच पावसामुळे रद्द झाल्या.

मयांक अगरवाल खेळणार?

अष्टपैलू विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्याने मयांक अगरवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. मयांकने एकही वनडे मॅच खेळलेली नाही. मयांकचा समावेश केल्यास संघातून काढणार कोणाला असा प्रश्न संघव्यवस्थापनापुढे आहे. राहुल आणि रोहित यांनी बांगलादेशविरुद्ध 180 धावांची सलामी दिली होती. रोहितने यंदाच्या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावं होतं तर लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली होती.

अशा परिस्थितीत मयांकला संधी मिळणार का प्रश्न आहे. मयांकला संघात स्थान मिळालं तर राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्ध याच क्रमांकावर अर्धशतकी खेळी साकारली होती.

मधल्या फळीचं काय करायचं?

ऋषभ पंत, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या यांच्यावर सलामीवीरांनी दिलेल्या पायावर कळस रचण्याचं आव्हान आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा सातत्याने धावा करत आहेत मात्र मधल्या फळीला त्या वेगाने धावा करता आलेल्या नाहीत. बांगलादेशविरुद्ध केदार जाधवऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती. कार्तिक संघात राहणार का केदारचं पुनरामगन होणार याविषयी साशंकता आहे. धोनीच्या स्ट्राईक रेटवरून बरीच चर्चा आहे. धोनी चौथ्या क्रमांकावर येणार अशीही चर्चा आहे. श्रीलंकेविरुद्ध मधल्या फळीचा तिढा सोडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

गोलंदाजीची धार कायम

जसप्रीत बुमराहने धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्यांवर सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. मोहम्मद शमीने विकेट्स मिळवल्या असल्या तरी त्याच्या गोलंदाजीवर भरपूर धावा होताना दिसत आहेत. भुवनेश्नर कुमारकडून आणखी अपेक्षा आहेत. हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्ध वेगात बदल करत उत्तम गोलंदाजी केली होती. फिरकीची धुरा युझवेंद्र चहलकडे आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने पाचच गोलंदाजांचा प्रयोग केला होता. श्रीलंकेविरुद्ध अतिरिक्त गोलंदाजांला संधी देण्याचा विचार होऊ शकतो.

श्रीलंकेला सन्मान वाचवण्याची संधी

श्रीलंकेच्या फलंदाजांकडे मोठी खेळी साकारत वर्ल्ड कपला चांगल्या पद्धतीने अलविदा करण्याची संधी आहे. दिमुथ करुणारत्ने, कुशल परेरा, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. चाळिशीकडे झुकलेल्या लसिथ मलिंगाने घोटीव यॉर्करसह आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने तशी साथ मिळालेली नाही. मलिंगाची ही शेवटची वर्ल्ड कप मॅच असणार आहे. विजयासह मलिंगाला निरोप देण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल.

हेड टू हेड

भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्ड कपमध्ये 8 मॅचेस झाल्या असून, भारताने 3 तर श्रीलंकेने 4 मॅच जिंकल्या आहेत. एक मॅच पावसामुळे रद्द झाली आहे.

संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, के.एल.राहुल, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल.

श्रीलंका: दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कसून रंजिथा, लसिथ मलिंगा, धनंजय डिसिल्व्हा, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरिवर्दना, लहिरू थिरिमाने, इसरू उदाना, जेफ्री व्हँडरसे.

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला