‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

- Advertisement -

मुंबई : दि. 22 जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस  लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, हे प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत.  वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान म्हणून द्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

००००

- Advertisement -