विधानसभा लक्षवेधी 

विधानसभा लक्षवेधी 
- Advertisement -


तक्षिला कॉलनीतील धोकादायक झोपड्यांकरिता भू-संपादनासाठी शासन सकारात्मक – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २९ : जोगेश्वरी (पूर्व) येथील तक्षिला कॉलनी परिसरातील धोकादायक स्थितीत असलेल्या झोपड्यांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे.  या कॉलनीतील गृहनिर्माण संस्थेमार्फत संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले असून, या झोपड्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता भू-संपादनाची प्रक्रिया राबविण्यास शासन सकारात्मक असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

सदस्य अनंत (बाळा) नर यांनी यासंदर्भात विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संजय पोतनीस यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

मंत्री देसाई म्हणाले की, ज्या जागांवर झोपड्या आहेत त्या बहुतांश खासगी मालकीच्या असल्यामुळे त्या पुनर्विकास योजनेत समाविष्ट करण्यासाठी संबंधित मालकांची संमती आवश्यक आहे. ही संमती वेळेत मिळाली नाही तर या ठिकाणी आवश्यकतेनुसार भूसंपादन कायद्यातील कलमान्वये भू-संपादनाची कार्यवाही करण्यासाठी सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/ विसअ

 



Source link

- Advertisement -