विधिमंडळ अधिवेशनासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य

विधिमंडळ अधिवेशनासाठी डिजिटल फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर अनिवार्य
- Advertisement -


मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला असून विधानभवनातील प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकग्निशन (चेहरा पडताळणी) प्रणाली लागू करण्यात आली आहे, याबाबतची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नसून फेस रेकग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळणार आहे.

सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी- कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकग्निशनसाठी तातडीने नोंदणी करणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ



Source link

- Advertisement -