वृद्ध आणि महिलांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मिटींगचे आयोजन

- Advertisement -

वृद्ध आणि महिलांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मिटींगचे आयोजन

भूषण गरुड : वृद्ध आणि महिलांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी शनिवार १४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ८:०० वा. सुमारास धायरी येथे वीर सावरकर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ आकाशदीप सोसायटी धायरी पुणे येथे ज्येष्ठ नागरिकांची सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अभिरूची पोलीस चौकीचे सपोनि ननावरे,पीएसआय कर्चे,पीएसआय शिंदे यांनी मीटिंग घेतली. भामट्याशी दोन हात कसे करावे, गुड टच-बॅड टच कसे ओळखावे आदी सतर्कतेचे धडे देण्यात आले.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. खासकरून वृद्धांची रस्त्यावर होणारी फसवणूक कशी रोखली जावी, सायबर भामट्याकडून चुना लागू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, यावेळी सांगण्यात आले. सदर मिटिंग करता एकूण ६० ते ७० पुरुष व महिला ज्येष्ठ नागरिक हजर होते. सदर मिटिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन करता अभिरूची पोलीस चौकीचे सपोनि ननावरे,पीएसआय कर्चे, पीएसआय शिंदे उपस्थित होते.

अभिरूची पोलीस चौकीच्या पोलिसांनी येऊन ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षा व महिलांनी घ्यावयाची दक्षता या विषयावर सखोल व आभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले. सभासदांच्या प्रश्नांचे निराकरण झाले.
वीर सावरकर ज्येष्ठ नागरिक मंडळाने अभिरुची पोलीस चौकीच्या सर्व पोलिसांचे आभार मानले.

- Advertisement -