शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘कबीर सिंग’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. कबीर सिंग चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे. एक वर्ग असा आहे ज्याला कबीर सिंगमध्ये शाहिदचा अभिनय खूप भावला तर दुसरा वर्ग असा आहे ज्यांना चित्रपट महिला विरोधी वाटला. खरंतर या चित्रपटात एक सीन आहे ज्यात कबीर सिंग प्रीतीच्या कानशीलात मारतो. या सीनवर लोक टीका करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने सांगितलं की, जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेवर जीवापाड प्रेम करता तेव्हा तिला कानशीलात मारण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यात इमोशन नसतील. प्रीतीनेदेखील कबीरला कानशीलात लगावली होती. जर तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही किंवा किस करू शकत नाही तर फिलिंग्स कशा दिसणार. त्यांच्या या वक्तव्यावरदेखील खळबळ माजली होती. याच दरम्यान नरगीस व राज कपूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सीन आवारा चित्रपटातील आहे ज्यात राज कपूर नरगीस यांचा हात मोडत त्यांच्या कानशीलात लगावाताना दिसत आहेत. त्यानंतरही नरगीस त्यांचे पाय पकडताना दिसत आहेत. कबीर सिंगच्या या सीनवरून हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. युजर्स राज कपूर यांना पहिले कबीर सिंग बोलत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, राज कपूर तर कबीर सिंग पेक्षा हिंसक दिसत आहेत. तर एका युजरने लिहिले की, मार खाण्याची भीती वाटत नाही, प्रेमळ वाटतात. कबीर सिंग चित्रपटाबद्दल सांगायचं तर बॉक्स ऑफिसवर २२६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी खूप कौतूक केले आहे.