नवी दिल्ली : विराट कोहली महेंद्रसिंह धानीप्रमाणे मैदानात कर्णधारपदाचा दबाव सहन करू शकत नाही, असं माजी खेळाडू गौतम गंभीरने म्हटलं आहे.
गंभीरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान विराट कोहलीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
विश्वचषकात धोनी आणि राहित शर्मा टीममध्ये असल्याने विराटला कर्णधार म्हणून जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. मात्र हेच जेव्हा विराट ‘आयपीएल’मध्ये एकटा खेळतो तेव्हा त्याचं नेतृत्व कमकुवत होतं, असं गंभीरने सांगितलं आहे.
दरम्यान, धोनी आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात आकाश-पातळाइतका फरक असल्याचही गौतम गंभीर म्हणाला आहे.
- Advertisement -


















WhatsApp