शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक; महिलेला 26 लाखांचा चुना

- Advertisement -

अमरावती : सध्या समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या लग्न जुळणाऱ्या संस्थांचे अँप उपलब्ध आहे. यापैकीच एक असलेले “शादी डॉट कॉम” या अँप वर अमरावतीतील एका महिलेची मुंबईतल्या एका तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीच्या माध्यमातून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. परंतु पुढील व्यक्तीने खोटे प्रोफाईल बनवून आणि कंत्राटदार असल्याचे सांगत अमरावतीच्या एका महिलेला 26 लाखांनी चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती येथील पती पासून विभक्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलाचा सांभाळ व स्वतःला आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी तिने शादी डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी केली. या दरम्यान तिची मुंबई मधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार असल्याची खोटी माहिती दिली. पण त्या माहितीवर विश्वास या महिलेने ठेवला होता. आपल्याला या व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवणूक झाल्याचे सांगत आरोपीने या महिलेला पैशाची मागणी केली. अजय सिंगने आधी पंधरा ते वीस लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरवातीला दोन लाख नंतर वीस लाख नंतर एक लाख नंतर नव्वद हजार आणि शेवटी दोन लाख असे एकूण सव्वीस लाख रुपयांचा चुना या आरोपीने महिलेला लावला. दरम्यान, एक दिवस हे दोघेही व्हिडिओ कॉल वर बोलत असतांना पीडित महिलेला एका महिलेचा आवाज आला. ती महिला कोण आहे हे जाणुन घेण्यासाठी तिने पुन्हा कॉल केला. महिलेने विचारणा केली असता मित्राची पत्नी आहे. असे खोटे कारण सांगितले. त्यानंतर अजयसिंह अग्रवाल हा आपली फसवणूक करीत असल्याचा संशय पीडित महिलेचा आल्याने तिने मुबंईला जाऊन अजय अग्रवाल याची विचारपूस केली असता त्याने फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्या महिलेने आरोपी अजयसिंग याच्या विरोधात अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्थेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -