हायलाइट्स:
- शाहरुख खानची लेक सुहाना सोशल मीडियावर नेहमीच असते चर्चेत
- सोशल मीडियावर होतेय सुहाना खानच्या फिटनेट आणि आउटफिट्सची चर्चा
- सुहाना खान देखील मलायकाच्या पावलावर पाऊल ठेवून आउटफिट्स वापरत असल्याचं बोललं जातंय
शाहरुखची लेक सुहानानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पिलाटिस स्किनफिट अॅक्टिव्हवेअरमध्ये दिसत आहे. सुहानानं ग्रे कलरचे हायराइज शॉर्ट्स घातले आहेत आणि यासोबतच तिनं क्रॉस हॉल्टर नेकलाइन स्पोर्ट्स ब्रा मॅच केली आहे. आपल्या वर्कआऊट आऊटफिट्समध्ये मलायका नेहमीच हॉटनेसचा तडका लगावताना दिसते. पण आता सुहाना देखील तिच्यासारखंच बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
सुहाना आणि मलायकानं फिटनेस व्यवस्थित मेंटेन केलेला आहे आणि आपली कर्व बॉडी या दोघीही बिनधास्त फ्लॉन्ट करताना दिसतात. या दोघींच्या जिमवेअरमध्ये काही आउटफिट्स असेही असतात जे तुमच्या फिगरला कॉम्प्लिमेंट आमि कर्व्सना हायलाइट करतात. याची प्रचीती या दोघींच्या फोटोंची झलक पाहिल्यावर येते. दोघीही वर्कआऊटच्या वेळी बॉडीफिट आऊटफिट्समध्ये दिसतात.

मलायका आणि सुहानाच्या वयात बऱ्याच वर्षांचं अंतर असलं तरीही शॉर्ट ड्रेस दोघीही उत्तम पद्धतीनं कॅरी करताना दिसता. ज्यात स्वेटशर्टचाही समावेश आहे. कोणत्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये या दोघीही खूप ग्लॅमरस दिसतात. हे त्यांचे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं. एकीकडे मलायका आपल्या आऊटफिट्ससोबत हिल्स वापरताना दिसते. तर दुसरीकडे सुहाना मात्र कॅज्युअल फुटवेअरमध्ये दिसते.

सुहाना खान आणि मलायका अरोरा यांची पसंत कट-आऊट ड्रेसच्या बाबतीतही सारखीच आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानानं एका बर्थ डे पार्टीमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तर दुसरीकडे मलायका अरोराकडेही अशा ड्रेसच्या कलेक्शनची कमी नाही. ती अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी अशाप्रकारचे ड्रेस उत्तम पद्धतीनं कॅरी करताना दिसते.

मलायका अरोरा आणि सुहाना खानच्या फिटनेसची सध्या सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा सुरू आहे. या दोघींही आपली नॅचरल कर्व्ह बॉडी आत्मविश्वासानं फ्लॉन्ट करताना दिसतात. याच कारणामुळे या दोघीही बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुपरग्लॅमरस दिसतात. एकीकडे अभिनेत्री असे कपडे घालण्याचं टाळतात. पण मलायका आणि सुहाना मात्र या ड्रेमधून सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतात.