शिर्डी : मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं सोमवारी अपहरण करण्यात आलं होतं. रात्री हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्यांचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिर्डी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर अपहरणाच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही वेळापूर्वी दत्तात्रय कोते हे स्वतः लोणी पोलीस ठाण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच निवडणुकीपासून ते नगराध्यक्ष महापौर किंवा तत्सम निवडणुकांमध्ये नगरसेवक आणि सदस्यांची पळवापळवी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, हे अपहरण का करण्यात आलं? कोणी केलं? याचा तपास पोलीस करत आहेत.
- Advertisement -
























WhatsApp