इंदापूर तालुका : बावडा परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख बळीराम शंकर सुर्यवंशी (वय ५१) रा. निरनिमगाव यांना लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करून जखमी केल्याच्या आरोपावरून तेथीलच सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांची दोन मुले व तानाजी शंकर पाटील अशा पाच जणांविरोधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुर्यवंशी हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असताना गावात शिवसेनेचे कटाऊट का लावले, तू गावचा पुढारी झाला आहे काय असे म्हणत वरील पाच जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. जखमी सुर्यवंशी यांचेवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हे. कॉ. अरुण रासकर करत आहेत. या घटनेचा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आरोपींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे