Home अश्रेणीबद्ध शेतकऱ्यानी शेतातच साठवलेला बटाटा चोरीला.

शेतकऱ्यानी शेतातच साठवलेला बटाटा चोरीला.

0

शेतकऱ्यानी शेतातच साठवलेला बटाटा चोरीला.

परवेज शेख मंचर: चक्क बटाट्याची चोरी ऐकुन नवल वाटले असेल परंतु आर्थिक मंदिचा फटका एवढा बसलाय की वाढत्या चो-या, गुन्हेगारी, बेरोजगारी,आता शेतक-यांनाही याची झळ बसु लागली आहे,या घटनेत आंबेगाव तालुक्यातील शेतकरी राम सीताराम बुट्टे यांच्या आरनीतील एक हजार 800 किलो बटाट्याची चोरी झाली. या बटाट्याची एकूण किंमत 55 ते साठ हजार रुपये आहे. सातगाव पठार हा परिसर बटाटा उत्पादनात अग्रेसर आहे. ऑक्‍टोबर महिन्यात काढणी केलेला बटाटा शेतकऱ्यांनी शेतातच साठवलेला आहे. ऊन, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी बटाट्याच्या ढिगावर वाळलेले गवत व सागाची पाने टाकली आहेत. शुक्रवारी (ता. 8) रात्री चोरट्यांनी आरनीतून बटाटे चोरून नेले.