शैलेश जगताप गनमॅन यांच्या वाढदिवसाचा खर्चातून इलेक्ट्रिक व्हीलचेयर मुस्कान ला दिली भेट

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

समर्थ पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस हवालदार झरीना मुबारक सय्यद यांची मुलगी मुस्कान ही अपंग असून ती बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिस्ट्रेशन इइ मध्ये शेवटच्या वर्षाला शिकत आहे.ती स्पर्धा परीक्षा देखील यु पी एस सी ची देत आहे. त्यासाठी तिला दैनंदिन जीवनात कामे करण्यास अडचणी येत असत त्यासाठी शैलेश जगताप यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्च केक पुष्पगुछ फ्लेक्स बॅनर व फटाके यावरील होणारा खर्च टाकून त्यांनी तिचे भवितव्य व उज्वल घडण्यासाठी ही व्हीलचेअर भेट दिली.

गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी असाच उपक्रम राबविला होता एका 92 वर्षाच्या आजीबाई ला सलमान खानला भेटण्याची इच्छा होती त्यांनी बरेच प्रयत्न करून सलमान बरोबर त्यांची भेट होत नव्हती अखेर ही बाब शैलेश जगताप यांना समजली आणि त्यांनी प्रत्यक्ष आजीबाई ना घेऊन गोरेगाव मुंबई येथे ते सलमान खानची शूटिंग चालू असताना आजीबाईंना सलमान बरोबर भेट घालून दिली.

- Advertisement -