शनिवारी एका गोंडस मुलीला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने जन्म दिला. त्यावेळी रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. रहाणेने हा सामना जिंकल्यानंतर त्वरित मुंबई गाठली आणि आपल्या ‘नन्ही परी’ची भेट घेतली. अजिंक्य आणि राधिकाला क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. रहाणेला मास्टर-ब्लास्टर सचिननेही गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले आहे.
आपल्या मुलीसोबत एक फोटो रहाणेने शेअर केला होता. सचिननेही त्या पोस्टवर रहाणेला एक सल्ला दिला. राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा, असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
- Advertisement -