‘सिक्स पॅक’च्या नावाखाली मांडला जातोय नशेचा बाजार

- Advertisement -

पुणे :  सिनेमे पाहण्याची तरुणांमधली क्रेझ नवी नाही. सिनेमांमधील सिक्स/एट अ‍ॅब्ज असणाऱ्या हिरोंना पाहून त्यांच्यासारखीच बॉडी बनवण्याची इच्छा अनेकांना होते. त्यातूनच सिक्स पॅक व्हायचे वेध त्यांना लागतात. मग, जिममध्ये जाऊन घाम गाळण्यास सुरुवात होते. जिममध्ये जाऊन मेहनत करण्यात गैर काहीच नाही. पण, लवरात लवकर रिझल्ट दाखवण्यासाठी जीममधील प्रशिक्षक मसलची पावर वाढवण्यासाठी बेकायदा औषध पुरवतात. ही औषधे चढ्या दराने विक्री केली जात असून जीम करणाऱ्या तरुणांकडून महागडी औषधे खरेदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. या औषधांचे परिणाम घातक असल्याने हे तरुण नशेच्या विळख्यात अडकण्याची शक्यता वाढली आहे.

पुणे पोलिसांनी अशाप्रकरे बेकयदा औषध विक्री करणाऱ्या तिघांना गजाआड केले असून अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहे. या तिघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. योगेश किसन मोरे (रा. दत्तप्रसाद बिल्डिंग, मुंकुदनगर), अशिष गोपाळ पाटील (रा. पिंपरी), सुरेश चौधरी (रा. गंगा सॅटेलाईट, वानवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १ लाख ८२ हजार १७६ रुपयांची औषधे जप्त केली आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि त्यांच्या पथकाला योगेश मोरे हा विरना परवाना औषध विक्री करताना दिसून आला. अन्न व औषध प्रशासनाचे सुहास सावंत यांनी योगेश विक्री करत असलेल्या औषधांची पाहणी केली. पाहणी दरम्यान हि औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करता येत नाहीत. तसेच त्याच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसून तो ही औषधे विना बिल विक्री करत होता. तसेच ही औषधे काही जीम तसेच अन्य ग्राहकांना विकत होता. योगेश याने ही औषधे परराज्यातून विना बिलासह खरेदी करून त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले.

योगेश विक्री करत असलेली औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाहीत. या औषधांचा गुणधर्म माहित नसताना जिममध्ये आणि इतर ग्राहकांना विक्री केली जाते. या औषधांमुळे स्वास्थ्यास आणि जिवीतास हानी पोहचू शकते. मफेथेरामाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर लो ब्लड प्रेशरमध्ये करण्यात येतो. पोलिसांनी मिळालेल्या औषधांवर उत्पादकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक नसल्याने ही औषधे नकली असलण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने वर्तवली आहे.

- Advertisement -