[ad_1]
हायलाइट्स:
- अभिनेत्री सागरिका सुमनने दिलेली माहिती खोटी
- अभिनेत्री सेलिना जेटलीने केला खुलासा
- अॅपमध्ये काम करण्यासाठी राजने नाही तर शिल्पाने केला होता संपर्क
राज कुंद्रानं किती केली कमाई, मिळाला प्रत्येक पैशाचा हिशोब
शिल्पा आणि सेलिना चांगल्या मैत्रिणी
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेलिनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सेलिनाला शिल्पाने संपर्क साधला होता. या दोघीजणी चांगल्या मैत्रिणी आहेत. शिल्पा अनेक अॅप चालवते त्यातील एक ‘जेएल स्ट्रीम’ आहे. याच अॅपसाठी सेलिनाला विचारणा झाली होती. तिला ‘हॉटशॉट्स’ कडून कोणतीही ऑफर आलेली नाही. तिला याबाबत काही माहीत नाही.’
सेलिनाने कामही केले नाही
शिल्पा शेट्टीच्या या अॅपसाठी सेलिनाने काम केले का असे विचारले असता तो प्रवक्ता म्हणाला, ‘नाही. सेलिनाकडे आधीपासूनच काही अन्य प्रोजेक्टना होकार दिला होता. त्यामुळे तिने शिल्पाच्या अॅपसाठी काम केले नाही. अर्थात बॉलिवूडमधील अन्य काही अभिनेत्रींशी त्यांनी संपर्क साधला होता.’
‘शिल्पा शेट्टीला क्लिन चीट दिलेली नाही’, कधीही होऊ शकते चौकशी
दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला मंगळवारी न्यायालायने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या जामिन अर्जावर बुधवारी किला मॅजिस्ट्रेटमध्ये सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राला जामिन देण्यास नकार दिला आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली, यात राजच्या याचिकेवरील सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे.
[ad_2]
Source link