Home बातम्या व्यवसाय सोन्याचा ‘भाव’ उतरला, चांदी ‘तेजीत’

सोन्याचा ‘भाव’ उतरला, चांदी ‘तेजीत’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील मजबूत स्थिती शिवाय ज्वेलरीच्या कमी मागणीमुळे सोन्याचा भाव सोमवारी १०० रुपयांवरून ३४,२७० रुपये प्रति १० ग्रामवर घसरला आहे. चांदीची किंमत ९० रुपयाच्या तेजी सोबत ३९,०९० रुपये किलोवर पोहचली आहे. सोने चांदी बाजारातील स्थानिक सराफांच्या कमी मागणीमुळे सोन्याचा भाव घसरत आहे.

पश्चिम आशियामध्ये असलेली तणावाची परिस्थिती आणि प्रमुख बँकेचा अनुत्साहामुळे हाजीर बाजारात सोन्याचा भाव सहा वर्षातील सर्वाधिक भाव आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी पिवळ्या धातूची निवड करत आहेत.

सोन्याचा नवीन भाव –

राजधानी दिल्लीत ९९.९% तसेच ९९.५% शुद्ध सोन्याचा भाव १०० रुपयांवरून क्रमश ३४,२७० आणि ३४,१०० रुपये प्रति १० ग्राम झाला आहे. शनिवारी सोने ७० रुपयाच्या वाढीसोबत ३४,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते.

चांदीचा नवीन भाव –

या दरम्यान चांदी ९० रुपयाच्या तेजीसह ३९,०९० रुपये किलोवर गेली आहे. डिलिव्हरीचा भाव १४४ रुपयाच्या ३८, ०९८ रुपये किलोवर पोहचली आहे.