दौंड : पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड मधील मेरगळवाडी येथे घडली आहे. बालवीर रोहिदास भोसले असे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार जॉकी चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या जॉकी कोंडक्या चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या मामाचा मुलगा बालवीर रोहिदास भोसले (वय ३५) रा. शिवाजी नगर श्रीगोंदा हा त्याच्या आत्याला भेटण्यासाठी रात्री दौंड येथे आला होता. आत्याला भेटून तो सकाळी जॉकी यासोबत शौचासाठी जात असताना झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या ८ ते ९ जणांच्या जमावाने कुऱ्हाड, चाकू, लाकडी दांडक्याच्या साहाय्याने बालविरवर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये बलविरचा मृत्यू झाला तर जॉकी चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे.
हल्ला करणारे संशयित हे श्रीगोंदा आणि दौंड येथील असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर येत असून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्यातील जखमी जॉकी चव्हाण याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन बारी यांनी घटना स्थळी भेट दिली.





























WhatsApp