स्पर्धक ठिक आहेत पण, यांना आवरा; लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल

स्पर्धक ठिक आहेत पण,  यांना आवरा;  लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल
- Advertisement -


मुंबई: सारेगमप लिटल चॅम्पसचं पहिलं पर्व खूपच गाजलं. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या स्वरानी सगळ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आता हे पंचरत्न पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.सारेगमप लिटल चॅम्पसचं नवीन पर्व नुकतंच सुरू झालं असून ही पाच जणं आता थेट परीक्षकांच्या खुर्चीत बसले आहेत.

सारेगमप लिटिल चॅम्प्स‘ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीचा ठरलेला आहे. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी त्यातील पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड,मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत आजही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी या पाच जणांना पुन्हा शोमध्ये परत आणलं. पण आता हे सर्व जणं सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

शोमधील स्पर्धक चांगले गातात, पण ‘लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक ओव्हर अॅक्टींग करतात, असं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. कार्तिकी गायकवाड हिला मराठी शोमधील नेक्का कक्कर म्हटलं आहे. कार्तिकीचे अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. तर रोहित राऊत अवधूत गुप्ते यांना कॉपी करतो, तर प्रथमेश लघाटे महेश काळे यांना कॉपी करतोय, असं अनेकांनी म्हटलं आहे. तर मुग्धा आणि आर्या यांचेही अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.


टीव्हीचा नवा अनलॉक लूक; रिअॅलिटी शोसह ‘या’ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

एलिमिनेशन नाही
‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ च्या या नवीन पर्वाची खासियत म्हणजे यात जे १४ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांचे एलिमिनेशन होणार नाही. त्यामुळे स्पर्धेचे जे टेन्शन असते ते स्पर्धकांना नसेल. अर्थात एलिमिनेशन जरी नसले तरी स्पर्धेसाठी म्हणून जी मेहनत, जो गाण्याचा सराव करावा लागतो तो या स्पर्धकांना करावाच लागणार आहे.

‘लिटिल चॅम्पस’ प्रथमेश लघाटे , मुग्धा आता थेट परीक्षकाच्या खुर्चीत





Source link

- Advertisement -