स्पीडनियमांचा भंगकेल्यास घर पोचयेणार दंडाची नोटीस

- Advertisement -


परवेज शेख राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहनांचा वेग व सीटबेल्ट तपासणीसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर व्हेईकल पोलीस दलात दाखल झाले असून चालत्या वाहनाचा वेग कॅमेरात कैद करून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास, तसे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला घरपोच दंडाची नोटीस जाणार आहे.

आज दिनांक 18 नोव्हेंबरपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली असून भरधाव वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे आणि चारचाकी मध्ये सीट बेल्ट न वापरणे या कारणांमुळे आपघातामध्ये मरण पावणाऱ्यांची प्रमाण जास्त आहे. या प्रकारावर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस महासंचालकांनी ट्राफीक पोलीसांना इंटरसेप्टर व्हेईकल हे वाहन दिलेले आहे. या वाहनांमध्ये गाडीची वेगमर्यादा, ब्रिथ एनेलायझर, काळ्या फिल्मची जोडणी मशीन या सुविधा आहेत. हे वाहन राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणार आहे. वाहनांमधील मशीन 100 मीटर परिसरातील 80 पेक्षा जास्त वेग मर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांच्या क्रमांक कॅमेरात कैद करते. हा क्रमांक कंट्रोल कडे जातो. त्यानंतर संबंधित गाडी मालकास दंडाची नोटीस घरपोच जाणार आहे. तसेच त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेशही जाणार आहे. वाहनांना न आडवताही ही कारवाई केली जाणार आहे. .

पुणे विभाग, महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते साहेब यांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास कसा होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले.

- Advertisement -