हा टीझर शेअर करत त्यानं ‘भूतकाळात जे घडलं ते घडलं. चला भविष्यात काय घडते ते पाहू या.. क्रिश ४’ या आशयाची कॅप्शन दिली आहे. तसंच क्रिशला १५ वर्षं पूर्ण झाल्यानं सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.
हृतिकनं २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटात सुपरहिरो साकारला. त्याचे वडील राकेश रोशन यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये ‘क्रिश ३’ हे चित्रपट आले. चाहत्यांचा त्याला प्रतिसादही मिळाला. २०१७ मध्ये चित्रपटाच्या चौथ्या भागावर काम करायचा निर्णय हृतिकनं घेतला. मात्र, हे काम काही पुढे गेलं नाही. त्यानंतर हृतिकनं ‘मोहेंजोदडो’, ‘काबील’, ‘सुपर ३०’ आणि आता ‘वॉर’ हे चित्रपट केले.