अशी मागणी खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या (पी – ४) वतीने करण्यात आली
पुणे : शहरातील सर्वच गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभेमध्ये पोलीस प्रतिनिधी हजर असले पाहिजेत. त्यातून गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक नवा प्रयोग होऊ शकतो अशी मागणी पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. अशोक मोराळे यांच्या कडे करणार आहे.
या सभांना पोलीस प्रतिनिधींनी हजेरी लावल्यास अनेक अनुचित गोष्टी घडण्यापूर्वीच पोलिसांना कळतील असा अंदाज आहे. एकदा का समस्या कळाल्या की त्यांच्या गांभीर्यानुसार त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अनेक गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होतात, प्रकरण हाणामारीपर्यंत जातं. हे वाद कमी व्हावेत हा महत्वाचा उद्देश आहे. पोलीस बैठकीला हजर असल्यास बोलण्यास कचरणाऱ्या मंडळींना धीर येईल आणि ते देखील समस्या मांडू शकतील असंही अनेकांना वाटतंय. सोसायट्यांच्या बैठकांमध्ये काही मुद्दे असे असतात जे गुन्ह्यांना आमंत्रण देणारे असतात किंवा गुन्ह्याचा/गुन्हेगारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दलचे असतात. हे मुद्दे कळाल्यास गुन्ह्यांना लवकर आळा घालता येऊ शकेल असं खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्थेंना ही वाटतंय.
या मुद्दांवर असावे पोलिसांचे लक्ष?
1)सदस्याकडून होणारा महिलांचा लैंगिक छळ, कौटुंबिक कहलाच्या तक्रारी
2)सोसायटी शेजारी असलेल्या बार,पब, हॉटेलमुळे होणारा त्रास
3)फटाके फोडणे, उगाच हॉर्न वाजवणे, बाईकची रेसिंग लावणे
4) गैरमार्गाने फ्लॅट भाड्याने देणे
5)अतिक्रमण, घुसखोरी
6)सोसायटीमध्ये चालणारे अवैध धंदे, रात्रीच्या मद्यधुंद आणि मोठ्या आवाजातील नाचगाणे व पार्ट्या यावर आळा
7)पोलीस पडताळणी झालेले सुरक्षारक्षक यावर नियंत्रण तसेच एजेन्सी परवाना आणि शासनाच्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची वेळोवेळी तपासणी
8)काही सोसायट्या पैसे वाचवण्यासाठी संपूर्ण जीविताची,संपत्तीची आणि माहितीची हानी करून विनापरवाना एजेन्सी नेमतात त्यावर आळा बसेल.
९) तर काही सोसायट्या मधील संचालक मंडळ आणि सचिव मिळून दिशाभूल करून सर्रास बेकायदेशीर कामे करून घेतात त्यात जीएसटी, पी एफ , इ एस आय सी , प्रायव्हेट टॅक्सेस, …इ बुडवतात…
१०) परप्रांतीय गुन्हेगार जे सोसायटी मध्ये हाऊसकिपींग, गार्डन मध्ये काम करणारे, लिफ्टमन, फ्लॅट दुरुस्ती करणारे कामगार याची माहिती मिळू शकते.
११) विविध मार्गाने कुरिअर आणि मटेरियल तसेच डिलिव्हरी बॉय येतात आणि प्लॅट ची माहिती घेऊन ही जातात त्यांच्या वर वचक निर्माण होईल.
१२) मोठ्या प्रमाणावर भाडेकरूंची माहिती प्रत्येक्ष जमा होऊन उलट सुलट तपासणी होईल.
वरील मुद्दे विचारात घेतले तर, यांच्याबाबत तक्रारी केल्या जाऊ शकतात. या तक्रारी कळाल्यानंतर पोलिसांना तत्काळ कारवाई करणं शक्य होईल. पोलिसांच्या या निर्णयाचं गृहनिर्माण संस्थां तर स्वागत करतील , पोलिसांच्या उपस्थितीमुळे गुन्ह्याशी निगडीत मुद्दे उपस्थित करण्यासाठी बरेच घरमालक पुढे येतील असा विश्वास या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सचिन मोरे (सी एम डी)
भारत शिल्ड फोर्स प्रा.ली
9623612363