Home गुन्हा ६ लाख ५० हजार रुपयांचे कोकेन नायजेरियन इसमाकडून जप्त

६ लाख ५० हजार रुपयांचे कोकेन नायजेरियन इसमाकडून जप्त

0


पुणे : परवेज शेख अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेकडून 6 लाख 50 हजार रुपयांचे कोकेन नायजेरियन इसमाकडून जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् व सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, गुन्हे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या पुणे शहर अंमली पदार्थमुक्त करण्याच्या आदेशानुसार अपर पोलीस आयुक्त गुन्हे, अशोक मोराळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ऑक्टोबर २०१९

रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व पोलीस उप निरीक्षक निलेश महाडिक त्यांच्या पथकाने बोपोडी जलशुद्धीकरण केंद्रासमोरील रस्त्यावर, बोपोडी येथे सापळा रचून मायकेल जॉन (रा. पिंपळे गुरव, मूळ नायजेरिया) याला पकडून त्याच्याकडून कोकेन व इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्यात 200/- रुपयांची सॅगबॅग, ६ लाख 50 हजार रुपयांची 130 ग्रॅम कोकेनची पावडर, ३७,५००/- रुपये रोख रक्कम, पासपोर्ट, सॅगबॅगमध्ये 500/- रुपयांचा मोबाईल, ८० हजार रुपयांची बजाज पल्सर दुचाकी, 600 रुपयांचा पॉकेट इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजनकाटा आदी ७,६८,८००/-रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उप निरीक्षक निलेश महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला ८ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अंजुम बागवान करीत आहेत.


सदरची कामगिरी गुन्ह्याचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, सहा. पोलीस आयुक्त शिवाजी पवारयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उप निरीक्षक निलेश महाडिक, किशोर तनपुरे, कर्मचारी अविनाश मराठे, प्रसाद मोकाशी, उदय काळभोर, प्रमोद मगर, सुनील चिखले, मंगेश पवार, संदीप साबळे, प्रवीण पडवळ, अमोल पिलाणे, नारायण बनकर यांनी केली आहे.