८ वर्षीय बालिकेवर तरुणाने केले अत्याचार

- Advertisement -

एका आठ वर्षीय बालिकेला फूस लावून तिचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना सेलू (जि. परभणी) तालुक्यातील कुंडी शिवारात घडली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत शनिवारी (१५ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी: एका आठ वर्षीय बालिकेला फूस लावून तिचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना सेलू (जि. परभणी) तालुक्यातील कुंडी शिवारात घडली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत शनिवारी (१५ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील कुंडी येथे गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच अशोक भगवान बालटकर या २५ वर्षीय युवकानं घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय बालिकेला हरभऱ्याचा टहाळ देतो अशी फूस लावून तिचं अपहरण केलं होतं. बराच वेळ झाला तरीही बालिका घरात, अंगणात व परिसरात दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. नेहमीच बालिकेच्या घराकडे येत असलेला आरोपी अशोक याच्या सोबत बालिका दिसल्याचे काही ग्रामस्थांनी तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर बालिकेच्या वडिलांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीविरुद्ध बालिकेला फूस लावून तिचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पालकांनी आरोपीच्या शेतात जावून शोध घेतला असता, बालिका त्याच्या शेतात सापडली. पालकांना पाहताच आरोपी अशोक याने तेथून पळ काढला. बालिकेची पोलिसांनी विचारपूस करून वैद्यकीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी वैद्यकीय तपासणीचा अहवाल येताच आरोपी अशोक बालटकर याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली.

- Advertisement -