भोजनाच्या सुविधांसंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न्याय्य मागणी मांडत असताना अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थी आंदोलकांचा पुण्यात युवक क्रांती दल आणि संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अधिकाराची लढाई चालूच राहिल ‘ अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना मांडली. गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी 10 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मूक निदर्शने करण्यात येणार आहेत. विद्यापीठाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा करू नका असे आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना केले.
सतीश गोरे, सतीश पवार, आकाश दौंडे, आकाश भोसले (मुक्त पत्रकार), कृणाल सपकाळे, मुन्ना आरडे, सोमनाथ लोहार यांचा त्यात समावेश होता .
रिफेक्टरी नियमांसंदर्भात आवाज उठवताना पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर १ एप्रिल २०१९ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. जर अधिकार मागणे गुन्हा असेल आणि अधिकार मागितल्यावर आंदोलकांना गुन्हेगार ठरविण्यात येणार असेल तर या लोकशाही देशामध्ये अशा बोलत्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करायलाच हवे. या जाणीवेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संयोजकांनी दिली.
जांबुवंत मनोहर, रूपाली पाटील-ठोंबरे, संदीप बर्वे, सागर सावंत, दिलीपसिंह विश्वकर्मा, दत्ता पोळ, राहुल डंबाळे, समीर गांधी, प्रशांत कनोजिया, सुकेश पासलकर, सुदर्शन चखाले नागेश भोसले आदी उपस्थित होते. रिफेक्टरी नियमांसंदर्भात विद्यापीठाचे परिपत्रक युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर यांनी या सभेत जाळले. १० ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मूक निदर्शने करण्यात येणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे म्हणाले, ‘कुलगुरूंच्या वर राजेश पांडेच सर्व निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांना विद्यापीठात ३५३ कलम हा व्यवस्थेविरुध्द लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकविण्याची व्यूहरचना आहे, असा आरोप भीम आर्मीचे दत्ता पोळ यांनी केला. विद्यापीठात बुधवारी, रविवारी संघाची शाखा भरते, असा आरोपही त्यांनी केला. फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारसरणीने हा संघर्ष लढावा लागणार आहे’