Home गुन्हा ०५ ,स्पोर्ट्स बाईक बारा लाख रुपये किंमतीच्या रिकव्हर चारकोप पोलिस ठाणेची कामगिरी

०५ ,स्पोर्ट्स बाईक बारा लाख रुपये किंमतीच्या रिकव्हर चारकोप पोलिस ठाणेची कामगिरी

0

प्रतिनिधि : शफीक शेख

मुम्बई : दि.०२/०८/२०१९ रोजी स.पो.नि. साळुंके व गुन्हे प्रकटीकरण पथक चारकोप पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना स.पो.नि साळुंके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेणुकानगर लिंक रोड परिसरात एक इसम चोरीची गाडी विकण्यास येणार आहे, सदर ठिकाणी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एका इसमास अटक करण्यात आली व त्याच्याकडून त्याने सदर गुन्ह्यात चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे तसेच सदर आरोपींकडून आज दि. ०८/०८/१९ रोजी तपासात खालील गुन्हे उघडकीस आले असुन आरोपीकडून एकूण ०५ स्पोर्टस बाइक अंदाजे १२ लाख रुपये किंमतीच्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत

१) चारकोप पो. ठाणे गु.र.क्र २३७/१९ क. ४०६,४२० भादवी कावासाकी निंजा मो.सा क्र एम.एच. १२ के एस ५७६४ कि. अं. ५,००,००० ₹

२) काळा चौकी पो.ठाणे गु.र.क्र.१३७/१९ कलम ४०६ भादवी के.टी.एम. मो.सा.क्र एम एच ०१ सी एस ८९१० कि.अं.२,००,०००/-

३) वर्सोवा पोलीस ठाणे गु.र.क्र.२२३/२०१९ कलम ४०६ भादवी के.टी.एम. डुक मो.सा. क्र एम एच ०२ इ टी २३३९ कि.अं.२,००,०००/-

४) डी. एन. नगर पो. ठाणे गु.र.क्र.३८२/२०१९ कलम ४०६,४२० भादवी के.टी.एम. मो.सा. क्र एम एच ०२ डी व्ही १६३९ कि.अं.२,००,०००/-

५) के.टि.एम.मो. सा.कि.अं.२,००,०००/- एच. ४८ ए स ६९४७ कि. अं २,००,०००/-

एकूण १२,००,०००/- रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

आरोपींचा गुन्हे अभिलेख
यापूर्वी नमूद आरोपींविरुद्ध घाटकोपर व नागपाडा या पोलीस ठाणेस या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी मा. पो.उ.आ. परि.११ डॉ. श्री. दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. स.पो.आ. मालवणी विभाग, श्री. दिलीप यादव , व.पो.नि. श्री. विठ्ठल शिंदे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. श्री.निलेश साळुंके, स.पो.उप.नि. चव्हाण, पो.ह. घरत पो.ना. पवार, पो.शि. उगले, पो.शि.लाड, पो.शि.वाघमारे, पो.शि. कांबळे, यांच्या पथकाने केली.

गुन्हे प्रणाली – सदर आरोपी OLX वरील अॅड बघून विक्रेत्यास संपर्क साधून त्यास गाडी खरेदी करण्यासाठी आलो आहोत असे सांगून पैसे दाखवून त्याचा विश्वास संपादन करून नमूद गाडी टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने घेऊन सदर गाडी पळवून नेत असे.

अटक आरोपीचे नाव व पत्ता आरीफ वकील खान, मु/१९ वर्ष, व्यवसाय- नाही, रा.ठी. रेहमानिया -२, रूम नं.०३, आजाद को.ऑ.सो, हिल नं २ सादिक शेठ चाळ, नारायण नगर, कांग्रेस आफिस रोड ,गौबनशाह दर्गा रोड, घाटकोपर (प), मुंबई

विठ्ठल शिंदे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
चारकोप पोलीस ठाणे,मुंबई.