Home गुन्हा शेतात काम करताना खांबातून विजेचा धक्‍का (शॉक) लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करताना खांबातून विजेचा धक्‍का (शॉक) लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0

 काम करताना खांबातून विजेचा धक्‍का (शॉक) लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू*

न्हावरे (ता.शिरुर) येथे शेतात काम करताना खांबातून विजेचा धक्‍का (शॉक) लागून नवनाथ अशोक कोरेकर (वय 38) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद विशाल कोरेकर यांनी न्हावरे पोलिसांत दिली आहे.

नवनाथ हे आपल्या शेतातील कडवळ पिकाला आज दुपारी पाणी देत होते, त्याचवेळी जवळ असलेल्या विजेच्या खांबाला त्यांचा स्पर्श झाला. खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने वीजेचा धक्‍का लागून नवनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरात विद्युत मंडळाच्या वाहक तारांची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे अपघाताचे धोके आहेत.

यातूनच एका तरुण शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी तक्रार परिसरातील ग्रामस्थांनी केली केली आहे. नवनाथ हे न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन कावड मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यांचा गावातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीचा सहभाग असायचा. पुढील तपास पोलीस कर्मचारी बी. एस. खोमणे व व्ही. डी. कापरे करीत आहेत.