Home ताज्या बातम्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

0

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन गंभीर जखमी*
कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 1) पहाटे बावधन येथे झाला. आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, महेश मधुकर काशीद आणि राम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी बंडू परशुराम काशीद (वय 43, रा. खडकमाळ, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कार चालक रामदास सुखदेव चौगुले (वय 29, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंडू यांचा पुतण्या आकाश हा मित्र महेश आणि राम यांना दुचाकीवर घेऊन जात होता. समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये आकाशच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, महेश आणि राम गंभीर जखमी झाले आहेत.