Home ताज्या बातम्या विघ्नहर्ता न्यासकडून वैद्यकीय सुविधा

विघ्नहर्ता न्यासकडून वैद्यकीय सुविधा

0

भुषण गरूड

विघ्नहर्ता न्यासकडून वैद्यकीय सुविधा

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणुकीत नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव पोलिस उपायुक्ता स्वप्ना गोरे यांनी दिली आहे. 
विघ्नहर्ता न्यासाचे मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचे हे बारावे वर्ष आहे. मिरवणूक मार्गावर चार ठिकाणी रुग्णवाहिका व सहा ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका सेवा बेलबाग, एसपी कॉलेज, अलका टॉकीज व पुरंम चौक(टिळक रस्ता) या ठिकाणी व आपत्कालीन वैद्यकीय सेवा गोखले हॉल लक्ष्मी रस्ता, नारायणपेठ पोलिस चौकी केळकर रस्ता, ग्राहकपेठ टिळक रस्ता, स्वीटहोम कुमठेकर रस्ता, शनिमंदिर दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाला कर्वे रस्ता याठिकाणी देण्यात येणार आहे. मोफत वैद्यकीयसेवेसाठी नागरिकांनी डॉ मिलिंद भोई विश्वस्त ८०८७६३९६३२, डॉ नंदकुमार बोरसे ९४२२०३२६९६, डॉ शंतनू जगदाळे ९०११९१६६०७, डॉ कुणाल कामठे ९८९०६१६३६५, सदाशिव कुंदेन ९९२१५७४४९९ यांना संपर्क करावा असे अहवान न्यासाकडून करण्यात आले आहे