चीनी सैनिकांची अरेरावी हिंदुस्थानी सैन्याला रोखण्याचा प्रयत्ना; हिंदुस्थानी सैन्याने दिले चोख उत्तर
लडाख या हिंदुस्थानच्या अविभाज्य घटकावर चीन आपला दावा सांगत आला आहे. या भागात चीनी आणि हिंदुस्थानच्या सैन्यात अनेकदा तणाव निर्माण होतो. बुधवारी पुन्हा एकदा या भागात चीनी सैनिकांनी अरेरावी करत हिंदुस्थानी सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पॅगाँग नदीच्या किनारी दोन्ही सैन्यात बाचाबाची झाली. परंतु नंतर दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली आणि परिस्थिती चिघळ्यापूर्वीच नियंत्रणात आली. मात्र असे असले तरी दोन्ही बाजूने सैन्याची अधिक कुमक या भागात तैनात करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी हिंदुस्थानी सैन्याचे जवान पॅनगाँग नदीच्या किनारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांचा सामना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांशी झाला. चीनचे सैनिक हिंदुस्थानी जवानांना इथे येण्यास मज्जाव करत होते. त्यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सीमेवर जवानांच्या अधिक संख्या वाढवण्यात आली.
चीनच्या सीमेवर हिंदुस्थानी सैनिक युद्धसरावाला जाणार आहेत. हिंदुस्थानी सैन्यातील माऊंटेन स्ट्राईक कोरचे 5 हजारहून अधिक जवान ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये हवाई दलासोबत युद्धसराव करतील. चीनच्या सीमेवर हा पहिला युद्धसराव असणार आहे.
2017 मध्ये डोकलाम प्रश्नावर रस्ता बांधण्यावरून हिंदुस्थानचे सैनिक आणि चीनचे सैनिक समोरासमोर आले होते. तेव्हा दोन्ही देशांत तणाव वाढला होता. डोकलाममुळे हिंदुस्थान आणि चीनमध्यी सीमेवरून वाद अजून वाढला होता. नंतर दोन्ही देशाच्या पुढाकराने हा प्रश्न तेव्हा सोडवण्यात आला होता.