Home गुन्हा ह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

ह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : ह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत रुग्णालय उभारणीस बेकायदा परवाना दिल्याबद्दल तत्कालीन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गणेश तात्याबा गोरे (रा.नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी काशीनाथ सौदागर तळेकर (वय 69, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ.सलमान खानबशीरखान पठाण, डॉ.तेजस्वीनी भगवान वाघमारे, डॉ.अभिनंदन सुभाष बुद्रुक, डॉ.दिपक विजय शिंदे, डॉ.महेश महादेव दरेकर, डॉ.पुष्कर शहा, डॉ.सचिन मोहन लकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने, आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, सिटरीन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमीटेड यांच्यासह जमीनीचे मुळ मालक दशरथ चंद्रकांत वाल्हेकर, नामदेव चंद्रकांत वाल्हेकर, जयश्री चंद्रकांत वाल्हेकर, आकाश नामदेव वाल्हेकर, अजिंक्‍य नामदेव वाल्हेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तळेकर यांचे मेव्हणे गणेश गोरे यांना 21 जुलै 2018 या दिवशी सायंकाळी पाच वाजता ह्दयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ नजीकच्या आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दिाखल केले. त्यावेळी डॉ.सलमान पठाण हे ह्दयरोगतज्ज्ञ नसतानाही त्यांनी रुग्णावर उपचार सुरू केले. रुग्णाची तब्येत गंभीर होत असताना त्यांनी ईसीजी रिपोर्ट काढून ह्दयरोगतज्ज्ञ डॉ.मोहन लकडे यांना व्हॉटस्‌अपद्वारे पाठविले. त्यांच्या सुचनेनुसार, डॉ.पठाणने रुग्णास तीन तास उशीराने इलॅक्‍झीन 30 हे इंजेक्‍शन दिले. त्यानंतर डॉ.तेजस्वीनी वाघमारे यादेखील ह्दयरोगतज्ज्ञ नसताना त्या रुग्णास रुग्णवाहिकेमध्ये घेऊन गेल्या, काही अंतर गेल्यानंतर त्या रुग्णावर कोणतेही उपचार न करता त्यांना घेऊन पुन्हा रुग्णालयामध्ये आल्या. दरम्यान रुग्णास वेळेत योग्य उपचार न मिळाले नाहीत. तसेच डॉ.पठाण, डॉ. शहा व डॉ.शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु झाला.

जमीनीचे मुळ मालक व रुग्णालय प्रशासन यांनी करारारनाम्यातील अटींचा भंग केला. संगनमत करुन बनावट दस्ताऐवजांद्वारे रुग्णालयाचे बेकायदेशीररीत्या बांधकाम केले. डॉ. माने याने रुग्णालयाच्या इमारतीस बेकायदा परवाना दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केतन थोरबोले करीत आहेत.