पुणे : परवेज शेख
खासदार गिरीशजी बापटसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १८ क मध्ये कार्यक्षम नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर यांच्या विकास निधीतून झगडेवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन लाईन विकसित करणे.
या कामाचा भूमिपूजन समारंभ नगरसेवक अजय आप्पा खेडेकर व परिसरातील जेष्ठ स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडला. अनेक दिवस या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या नवीन लाइनमुळे याभागातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या वेळी परिसरातील स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.