दुचाकी वाहन चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

- Advertisement -

दुचाकी वाहन चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
सराईत वाहन चोराकडुन ०४ मोटार सायकल हस्तगत करण्यात युनिट-१ गुन्हे शाखा,पुणे शहर पोलीसांना यश

पुणे : परवेज शेख दिनांक २१/१०/२०१९ रोजी विधानसभा मतदान बंदोबस्ताचे संदर्भाने युनिट-१ कडील पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते, पो.शि.७४२८ प्रशांत गायकवाड, पो शि ८४०३ गजानन सोनवणे, पो शि २६१४ तुषार माळवदकर असे पेट्रोलींग करीत असताना पो.शि प्रशात गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत दुचाकी वाहनचोराच्या संदर्भात मिळालेल्या बातमीवरून सापळा लावून छापा टाकुन दुचाकी वाहने चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे धिरज सुरेश लोखंडे वय २३ वर्ष, रा मु.पो कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, मराठी शाळेजवळ पुणे मुळगाव मु पो भंडीशेगाव ता पंढरपुर जि सोलापुर यास एका चोरीच्या दुचाकी मोटरसायकलसह ताब्यात घेतले.त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याचेकडुन वाहनचोरीचे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीने चोरलेली सदरची वाहने विकण्यासाठी लपवून ठेवली होती. ती हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपीकडून ०४ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई ही श्री.अशोक मोराळे सो.,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंग,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. श्री. शिवाजी पावार, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंधक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पो उप निरी लहु सातपुते, पो.शि. प्रशांत गायकवाड, गजानन सोनुने, तुषार माळवदकर, योगेश जगताप, बाबा चव्हाण, अजय थोरात,सुभाष पिंगळे, सचिन जाधव, अशोक माने, अनिल घाडगे,सुधीर माने यांनी केली आहे.

- Advertisement -