मानाच्या श्री सार्वजनिक गणेश मंडळाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आरती – महासंवाद

    - Advertisement -

    हिंगोली, दि. १७ : शहरातील मानाचा आणि १०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ‘श्री सार्वजनिक गणेश मंडळा’ला राज्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती केली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

    यावेळी अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, फुलाजी शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल, गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास गोरे, कपील मुंदडा, राजकुमार देशमुख, राकेश भट्ट, बाबा घुगे, संजय पवार, प्रशांत गुप्ता, संजय ढोके, संजय खंडेलवाल, नंदू खिल्लारे, निखिल बांगर, राजेंद्र हलवाई, पवन उपाध्ये, सुनील पाठक, गुड्डू देवकते, महेश शहाणे, निलेश बगडीया आणि प्रेम इंगळे, नागेश बांगर यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शतकोत्तरी परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. आरतीनंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

    ०००

    - Advertisement -