लोकसंवाद कार्यक्रमातून ‘पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांची माहिती – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क विभागातर्फे लोकसंवाद अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात १००० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून ‘पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यांची’ माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना नुकतीच देण्यात आली. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून त्या त्या जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी आणि मेळाव्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    कुलाबा येथील श्री सेवा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन, कुलाब्याचा युवराज गणेश मंडळाचे हरिश बलसाने, कुलाब्याचा सम्राट गणेश मंडळाचे अध्यक्ष भगवान शहा, फोर्ट येथील इच्छापूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष रूपेश सुर्वे, खारघरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव चवरे यांच्यासह विविध मंडळांचे सदस्य आणि भक्तगण यावेळी उपस्थित होते. मुंबई शहर जिल्ह्याचे रोजगार मेळावा समन्वयक अजय कांबळे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळाव्यांविषयी माहिती दिली.

    000

    संध्या गरवारे/विसंअ

    - Advertisement -