स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी तसेच राजस्थानचे माजी राज्यपाल स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त 13 नोव्हेंबर, 2026 रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (3) डॉ.विलास आठवले, सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) प्रकाश थिटे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    ००००

    - Advertisement -