समान नागरी कायद्याबाबत सूचना, हरकती व मते नोंदविण्यासाठी जनसुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १४ : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था आणि नागरिकांच्या सूचना, हरकती व मते जाणून घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याची जनसुनावणी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कोकण भवन, नवी मुंबई येथील कार्यालयात होणार आहे. संबंधितांनी या जनसुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई शहर तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार  यांनी केले आहे.

    समान नागरी कायद्याबाबत सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित समितीमार्फत या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध हितसंबंधी गट, संस्था आणि नागरिकांना जनसुनावणीत आपली भूमिका मांडता येणार आहे.

    ०००

    - Advertisement -