
मुंबई, दि. १४: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००
- Advertisement -

WhatsApp