
मुंबई, दि. १४: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव घनश्याम जाधव, कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी प्रदीप कोपार्डे तसेच सहायक कक्ष अधिकारी सुनील जाधव तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००
- Advertisement -

WhatsApp